कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं सासरला सासरला
कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं सासरला सासरला
कृष्णेचं पाणी कोयनेचं पाणी
एकरूप झालं
आलिंगनी बाई आलिंगनी
ओळखायचं सांगा कसं कुणी
ओळखायचं सांगा कसं कुणी
संसारचं तीर्थ बांधलं
लक्ष पायर्या घाटाला घाटाला
कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं सासरला सासरला
एका आईच्या पोटी येऊनि
ताटातुटी जन्मापासुनि
सासर माहेर नाव सांगुनि
सासर माहेर नाव सांगुनि हो हो हो
नयनी नातं गहिवरूनि
बहीण भेटली बहिणीला बहिणीला
कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं सासरला सासरला
शतजन्माची ही पुण्याई
घेऊन आली कृष्णामाई
शतजन्माची ही पुण्याई
घेऊन आली कृष्णामाई
कोयना येई झुलवित डोई
कोयना येई झुलवित डोई हो हो हो
मंगल घट ते न्हाऊ घालण्या
सुवासिनीच्या प्रीतीला प्रीतीला
कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई
येऊन मिळालं सासरला सासरला
Log in or signup to leave a comment
Login
Signup