तुजहून लाजरे हे बोलावयास लाजे
हे फूल लाजवंती सांगेल गुज माझे
होकार दे तयाला
होकार दे तयाला नाही म्हणू नको ग
नको ग फुलाची शपथ
तुला या फुलाची शपथ
तुला या फुलाची शपथ
तूतो धनी धनाचा मी एक दीन दासी
तूतो धनी धनाचा मी एक दीन दासी
का जोडीसी जिवांसी अपमान आपदासी
एका अकिंचनेला
एका अकिंचनेला भलते पुसू नको रे
नको रे फुलाची शपथ
तुला या फुलाची शपथ
तुला या फुलाची शपथ
मानून स्वामिनी हे तुज फूल वाहिले मी
मानून स्वामिनी हे तुज फूल वाहिले मी
पाहून साहसा या भ्याले शहारले मी
माझी न योग्यता ती
माझी न योग्यता ती मज उंचवू नको रे
नको रे फुलाची शपथ
तुला या फुलाची
तुला या फुलाची
Log in or signup to leave a comment
Login
Signup