Tujya Preetiche Dukh Mala

आ आ आ आ आ, आ आ आ आ आ
तुझ्या प्रीतीचे रे
तुझ्या प्रीतीचे दु:ख मला दाउ नको रे
वधुनि जाइ, प्राण घेइ
वधुनि जाइ, प्राण घेइ, ठेवु नको रे
तुझ्या प्रीतीचे
तुझ्या प्रीतीचे रे
तुझ्या प्रीतीचे


याचे ममतेचा लोभ मला कळला आता
कुण्या ठिकाणी आहे जाउन लावा पता
तिथे चालत जाइन आप अंगे स्वत:
जाउन सांगा की हो
जाउन सांगा की रानभरी हो‍उ नको रे
वधुनि जाइ, प्राण घेइ
वधुनि जाइ, प्राण घेइ, ठेवु नको रे
तुझ्या प्रीतीचे रे
तुझ्या प्रीतीचे

जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
होहोओहोहोहोह
जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
झड घालुन देतो प्राण दीपकाचे वरी
हे मी सांगत असताना का गे पडले भरी
रत्‍न टाकुन पदरात गार घेउ नको रे
वधुनि जाइ, प्राण घेइ, ठेवु नको रे
तुझ्या प्रीतीचे
तुझ्या प्रीतीचे रे
तुझ्या प्रीतीचे
Log in or signup to leave a comment

NEXT ARTICLE