शपथ दुधाची या आईच्या
शपथ दुधाची या आईच्या
फिर माघारी पोरी
शपथ दुधाची या आईच्या
तुझे भुकेने व्याकुळलेले बघुनी ग डोळे
उरी मायेच्या काळजाचे पाणी पाणी झाले
चार घास हे तुला भरविते माझ्या ओठावरले
डोळ्यांमधले पाजिल पाणी गंगा राजापुरी
शपथ दुधाची या आईच्या
जन्मलीस तू अभिमानाच्या थोर मराठ्याकुळी
प्राण देउनी आजवर ज्यांनी अब्रू ही ग जपली
हरिश्वंद्रापरी सत्त्वकसोटी असेल ग अपुली
दुरुनी बाळे दैव पहाते गरिबी आणून घरी
शपथ दुधाची या आईच्या
फिर माघारी पोरी
शपथ दुधाची या आईच्या
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận
Đăng nhập
Đăng ký