हम्म हम्म हम्म हम्म हम्म
रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी

आठवणींच्या गंधफुलांनी दरवळणारा श्रावण मी

आकाश पावसाचे
ते रंग श्रावणाचे
ओथंबल्या क्षणांचे
रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आ आ आ आ आ आ
हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या ओ ओ तुझ्या मनाच्या
हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफुलांनी दरवळणारा श्रावण मी
रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम
रंगली फुगडी बाई रानात रानात रानात
वाजती पैंजण बाई तालात तालात तालात
फांदीवरला झोका उंच उंच ग झुलताना
उंच उंच ग झुलताना उंच उंच ग झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
हळूच पुढे तू करताना हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओ ओ तुझ्या गुलाबी
ओठांवरती थरथरणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफुलांनी दरवळणारा श्रावण मी
रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आ आ आ आ आ आ
पावसातले दिवस आपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऐकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी तिथेच कोठेतरी
अजूनही मोहरणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफुलांनी दरवळणारा श्रावण मी
रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
अजुनीच त्या ठिकाणी
ती श्रावणओली गाणी
माझी-तुझी कहाणी
रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận
Đăng nhập
Đăng ký