Nako Tai Rusu

नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
येऊ दे ग गालांत खुदकन हसू
येऊ दे ग गालांत खुदकन हसू
नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू

इवल्याश्या नाकावर मोठ मोठा राग
इवल्याश्या नाकावर मोठ मोठा राग
देऊ काय तुला, हवे ते माग
देऊ काय तुला, हवे ते माग
नवरा हवा का, लठ्ठ हवी सासू
नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
येऊ दे ग गालांत खुदकन हसू
नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू

बाहुलीच्या लग्नाचा खेळ गडे खेळू
बाहुलीच्या लग्नाचा खेळ गडे खेळू
लग्नांत बुंदीचे लाडू आता वळू
लग्नांत बुंदीचे लाडू आता वळू
नवीन कपड्यांत छान छान दिसू
नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
येऊ दे ग गालांत खुदकन हसू
नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट
चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट
केशरी भात केला, आहे मोठा थाट
केशरी भात केला, आहे मोठा थाट
ओठांत आले बाई लडिवाळ हसू
नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
येऊ दे ग गालांत खुदकन हसू
नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP