Muli Too Aalis Apulya Ghari

लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी

हळदीचे तव पाऊल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
हळदीचे तव पाऊल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
सोन्याहुनी ग झाली पिवळी
सोन्याहुनी ग झाली पिवळी
मांडवाला कवळुन चढली चैत्रवेल ही वरी
मुली तू आलीस अपुल्या घरी

भयशंकित का अजुनी डोळे
भयशंकित का अजुनी डोळे
नको लाजवू सारे कळले
नको लाजवू सारे कळले
लेकीची मी आहे आई
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होऊन मीही आले याच घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी

याच घरावरी छाया धरुनी
याच घरावरी छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी बिलगुनि माझ्या उरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
मुली तू आलीस अपुल्या घरी
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP