Mee Aaj Phul Zale

मी आज फूल झाले मी आज फूल झाले
मी आज फूल झाले
जणू कालच्या कळीला लावण्यरूप आले
मी आज फूल झाले

सोन्याहुनी सतेज ही भासते सकाळ
किरणांतुनी रवि हा फेकीत इंद्रजाल
मी बावरी खुळी ग या सावलीस भ्याले
मी आज फूल झाले मी आज फूल झाले

आली कशी कळेना ओठांस आज लाली
स्पर्शून जाय वारा शब्दांस जाग आली
फुलवून पाकळ्या मी ओल्या दंवात न्हाले
मी आज फूल झाले मी आज फूल झाले

मी पाहते मला का डोळे भरून आज
लागेल दृष्ट माझी पदरी लपेल लाज
मी आज यौवनाचा शृंगारसाज ल्याले
मी आज फूल झाले मी आज फूल झाले
जणू कालच्या कळीला लावण्यरूप आले
मी आज फूल झाले
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP