Lal Kinari Sadi Motiya

लाल किनारी साडी मोतिया
लाल किनारी साडी मोतिया
तुझीच आवड लेवून सजाया
तुझीच आवड लेवून सजाया
येते तुहला मी भेटाया मी भेटाया
लाल किनारी साडी मोतिया
लाल किनारी साडी मोतिया

तूच स्पर्शिता कोमल हा कर
तूच स्पर्शिता कोमल हा कर
सा रे ग म सुस्वर उठले तनूवर
सा रे ग म सुस्वर उठले तनूवर
लाजवंतीचे पिवळे बिल्वर,पिवळे बिल्वर
रुणझुणले किती तुज रिझवाय
लाल किनारी साडी मोतिया
लाल किनारी साडी मोतिया

तुझसाठी मी सजले नटले
तुझसाठी मी सजले नटले सजले नटले
प्रतिबिंबाला बिंब भेटले
प्रतिबिंबाला बिंब भेटले
लाजून जे मी मनात म्हटले मनात म्हटले
आली प्रणया तुज सांगाया तुज सांगाया
लाल किनारी साडी मोतिया
लाल किनारी साडी मोतिया
Log in or signup to leave a comment

NEXT ARTICLE