काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुमी न बाई मी बडबडले
काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुमी न बाई मी बडबडले
अन गालावरती खुणा बघुनी
आई म्हणाली काय घडले
आता सांगू कशी, बोलू कशी
नाव कुणाचं घेऊ कशी मी
तू माझी मंजुळा, गोड तुझा गळा
दुरून तू पाहू नको
रंगानं तू गोरी, गं दिसतेस पोरी
जवळ ये लाजू नको
ये जवळ ये लाजू नको, ये जवळ ये लाजू नको
काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुमी न बाई मी बडबडले
अन गालावरती खुणा बघुनी
आई म्हणाली काय घडले
आता सांगू कशी, बोलू कशी
नाव कुणाचं घेऊ कशी मी
धरला माझा हात तुम्ही
अन मी ओरडले पुरे करा
बाई सपनामंदी
भीत किती पण तुम्ही म्हणाला
डाव आजचा करू पुरा
बाई सपनामंदी
पाठशिवणीचा चा खेळ खेळता
पाय घसरुनी मी पडले
अन गालावरती खुणा बघुनी
आई म्हणाली काय घडले ?
आता सांगू कशी, बोलू कशी
नाव कुणाचं घेऊ कशी मी
तू भिरभिरतं पाखरू
ग बघतोय धरू
तरी मला घावंना
झालो तुझ्यावर ख़ुशी
तू माझी मिशी
तुझ्याविन ऱ्हावंना
चल गवतात शिरू न
गंमत करू
उगाच येळ आता लाऊ नको
रंगानं तू गोरी, गं दिसतेस पोरी,
जवळ ये लाजू नको
ये जवळ ये लाजू नको, ये जवळ ये लाजू नको
दाटवनामधे गाठून मजला
तुम्ही इचारलं काही
अहो सपना मंधी
गोंधळून मी दिली कबुली
मलाच कळलं नाही
बाई सपना मंधी
चुकी समजली ध्यानात आली
घाबरून मी धडपडले
अन गालावरती खुणा बघुनी
आई म्हणाली काय घडले
आता सांगू कशी बोलू कशी
नाव कुणाचं घेऊ कशी मी
अगं सांग तुझ्या बापाला
ग सपनात आला सदाशिव शेजारी
आला सदाशिव शेजारी
डोळ्यान ग केली मस्करी
खुणा उमटल्या गालावरी
काय होईल ते होऊदे
कोर्टात जाऊदे फिकीर त्याची करू नकोस
रंगानं तू गोरी गं दिसतेस पोरी
जवळ ये लाजू नको
ये जवळ ये लाजू नको
ये जवळ ये लाजू नको
Log in or signup to leave a comment
Login
Signup