Hech Te Ga Tech He

हेच ते ग तेच हे ते स्वप्नी येती सारखे
मूर्त केले स्वप्न तू हे चित्ररेखे लाडके
हेच ते ग तेच हे ते

हेच डोळे ते टपोरे हीच कांती सावळी
हेच डोळे ते टपोरे हीच कांती सावळी
नासीकेखालील रेषा हीच काळी कोवळी
हेच हसरे ओठ बाई
हेच हसरे ओठ बाई मूक तरिही बोलके
हेच ते ग तेच हे ते

हीच छाती रुंद जेथे मीच माथे टेकिले
हीच छाती रुंद जेथे मीच माथे टेकिले
लाजुनीया चूर झाले भीत डोळे झाकिले
ओळखीली माळ मी ही
ओळखीली माळ मी ही हीच मोती माणिके
हेच ते ग तेच हे ते

गूज करिती हे कधी ग धरुन माझी हनुवटी
गूज करिती हे कधी ग धरुन माझी हनुवटी
प्रश्‍न पुशिती धीट केव्हा मूठ पडते मनगटी
ओठ ओले करुन जाती
ओठ ओले करुन जाती काय सांगू कौतुके
हेच ते ग तेच हे ते स्वप्नी येती सारखे
मूर्त केले स्वप्न तू हे चित्ररेखे लाडके
हेच ते ग तेच हे ते
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP