Bai Gela Mohan Kuni Kade

रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे ग बाई
गेला मोहन कुणीकडे
रिमझिम पाऊस पडे सारखा
तरुवर भिजले भिजल्या वेली
ओली चिंब राधा झाली
तरुवर भिजले भिजल्या वेली
ओली चिंब राधा झाली
चमकुन लवता वरती बिजली
चमकुन लवता वरती बिजली
दचकुन माझा ऊर उडे ग बाई
गेला मोहन कुणीकडे
रिमझिम पाऊस पडे सारखा
हांक धावली कृष्णा म्हणुनी
रोखुनी धरली दाही दिशांनी
हांक धावली कृष्णा म्हणुनी
रोखुनी धरली दाही दिशांनी
खुणाविता तुज कर उंचावुनी
खुणाविता तुज कर उंचावुनी
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई
गेला मोहन कुणीकडे
रिमझिम पाऊस पडे सारखा
जलाशयाच्या लक्ष दर्पणी
तुझेच हसरे बिंब बघुनी
जलाशयाच्या लक्ष दर्पणी
तुझेच हसरे बिंब बघुनी
हसता राधा हिरव्या रानी
हसता राधा हिरव्या रानी
पावसातही ऊन पडे ग बाई
गेला मोहन कुणीकडे
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे ग बाई
गेला मोहन कुणीकडे
रिमझिम पाऊस पडे सारखा
Log in or signup to leave a comment

NEXT ARTICLE