Deva Daya Tujhi

देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला

भाळावरी बसे या निष्ठूर ही कुठार
घावांतुनी उडावे कैसे सुधा तुषार
निर्जीव जन्म माझा
निर्जीव जन्म माझा त्या अमृतात न्हाला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
देवा दया तुझी

माझ्या मुलास लाभे सुखछत्र रे पित्याचे
ही प्रीतिची कमाई की भाग्य नेणत्याचे
उद्ध्वस्त मांडवाच्या
उद्ध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
देवा दया तुझी

सौख्यात नांदताना का दुःख आठवावे
जे नामशेष झाले ते काय साठवावे
हास्यात आजच्या
हास्यात आजच्या या कळ कालची कशाला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
देवा दया तुझी
Log in or signup to leave a comment

NEXT ARTICLE