बंगलोरी नको मंगलोरी मलमल आणा कि ढाक्याची
अग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची

ग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
लपलेलं गूढ उकलाया दूर शिमल्याला जाऊ या
लपलेलं गूढ उकलाया दूर शिमल्याला जाऊ या
अग नग नग तिथं नग चल जोतिबा पाहूया
मोत्याची नको पवळ्याची ठुशी कराल का ठोक्याची
हो हो देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
काश्मीर च्या उन्हा मधी चल गुलाबी संसार थाटू
अग येतीस का पंढरीला माझ्या विठुबा ला भेटू
सोन्याची मोठ्या दाण्याची घ्या नथनी नाजूक नाकाची
हो हो देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
चल सजणा परदेशी नाचू गाऊ english गाणी
अरे चल सजना परदेशी नाचू गाऊ english गाणी
हो हो त्याचा परिस लई भारी माझ्या रामदासा ची वाणी
तुमची मी अन माझी तुम्ही वाट किती बघावी मोक्याची
अग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
ग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
दडवली कशी घडवली बघू अजंठा वेरूळ लेणी
अग तिथलीच तू मूर्ती ग तुला चोरून आणलंय कोणी
लई झालं बाई वय झालं मला चाहूल लागली धोक्याची
हो हो देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
Log in or signup to leave a comment
Login
Signup