ही गुणाची गोजिरी ग गौर माझी साजिरी
गौर माझी साजिरी
कोणत्या ग दूर देशी सोडुनिया रायरी
चालली गोदावरी गं
चालली गोदावरी
साज घाला सोनियाचा कंकणे हिरवा चुडा
कंकणे हिरवा चुडा
पाटली बिंदी बिजोरा गळसरीचा आकडा
गळसरीचा आकडा
केशरी कुंकू कपाळी साजते ही लाजरी
चालली गोदावरी गं
सनई मंजुळ वाजतें हा सूरगंधाचा सडा
सनई मंजुळ वाजतें हा सूरगंधाचा सडा
नादतिं घन दुंदुभि झडतो गडावर चौघडा
झडतो गडावर चौघडा
टूर रानी ऐकूं येई मोहनाची बासरी
चालली गोदावरी गं
चालली गोदावरी
लागली हुरहुर जीवा चिंब डोळ्यांच्या कडा
पाहता हे रूपराणी जात ऐन्याला तडा
जात ऐन्याला तडा
दृष्ट काढा ग सईची लोण राई मोहरी
चालली गोदावरी गं
चालली गोदावरी
वाट ही विसरूं नको माहेरची माझे सखी
माहेरची माझे सखी
ये कधीकाळी मुली ग ठेव बाई ओळखी
ठेव बाई ओळखी
ग नको पाहूं वळोनी जा सुखे जा सासरी
चालली गोदावरी गं
चालली गोदावरी
ही गुणाची गोजिरी ग गौर माझी साजिरी
चालली गोदावरी गं
चालली गोदावरी
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận
Đăng nhập
Đăng ký