अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं ह्याला गरम शिणगार सोसंना
(ह्याला गरम शिणगार सोसंना)
ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा
हितं शाहिरी लेखणी पोचंना
(हितं शाहिरी लेखणी पोचंना)
हितं वरणभाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
का हो अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय् अळीमिळी
अन् सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन् भायेर नळी रं, रं, रं
अगं चटकचांदणी, चतूर कामिनी
काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन
कोन व्हय व्हय कोन
छबीदार छबी मी तोर्यात उभी,
छबीदार छबी मी तोर्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी
अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं

(अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं)
नवतीचं रान हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं
बांधावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी
अरं लाजमोड्या, भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं
अरं लाजमोड्या, भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं
(अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं)
डौल दावते मोराचा, तिरपा डोळा चोराचा
वढ्याच्या काठाला आडिवतो, अंगावर पानी उडिवतो
अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं
अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं
(अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं)
मिरचीचा तोरा मी करते रं, वट्यात ऐवज भरते रं
पदर माझा धरतोस कसा, भवतीनं माझ्या फिरतोस कसा
अरं बत्ताशा, कशाला पिळतोस मिशा, हे वागणं बरं नव्हं