ओ ओ असा नेसून शालू हिरवा
असा नेसून शालू हिरवा
आणि वेणीत खुपसून मारवा
जाशी कुणीकडे जाशी कुणीकडे
कुणाकडे सखे सांग ना
का ग बघतोस मागे पुढे
ओ ओ का रे वाटेत गाठून पुससी
का रे वाटेत गाठून पुससी
का रे निलाजऱ्या तू हसशी
जाते सख्याकडे जाते सख्याकडे
प्रियाकडे तुला सांगते
त्याची माझी रे प्रेत जडे
तुजपरी गोरी गोरी चाफ़्यावानी सुकुमारी
दुपारचा पार ऊन जलते ग वर ऊन जळते
टकमक बघू नको जाऊ नको तिच्या वाटे
का रे उठाठेव तिला कळते रे तिची तिला कळते
ओ ओ का ग आला असा फणकारा
का ग आला असा फणकारा
कंकणाच्या करीत झंकारा
जाशी कुणीकडे जाशी कुणीकडे कुणाकडे
सखे सांग ना
का ग बघतेस मागे पुढे
दूर डोंगरी घुमते बासरी
चैत्र बहरला वनमधी रे वनमधी
पदर फडफडतो उर धडधडतो
प्रीत उसळते मनामध्ये बघ मनामध्ये
ओ ओ मी भल्या घारातील युवती
मी भल्या घारातील युवती
लोक फिरतात अवतीभवती
जाते सख्याकडे जाते सख्याकडे
प्रियाकडे खरं सांगते
म्हणून बघते मी मागे पुढे
Log in or signup to leave a comment
Login
Signup