Yuge Atthavis Vitevari Ubha

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

जय देव जय देव (जय देव जय देव)
जय देव जय देव जय पाण्डुरंगा ओ हरी पांडुरंगा (जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा)
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा (रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा)
पावें जिवलगा (पावें जिवलगा)
जय देव जय देव (जय देव जय देव)

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं
कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती

जय देव जय देव (जय देव जय देव)
जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा (जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा)
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा (रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा)
पावें जिवलगा (पावें जिवलगा)
जय देव जय देव (जय देव जय देव)

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां
राही रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळितो राजा विठोबा सांवळा

जय देव जय देव (जय देव जय देव)
जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा (जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा)
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा (रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा)
पावें जिवलगा (पावें जिवलगा)
जय देव जय देव (जय देव जय देव)

ओवाळूं आरत्या कुर्वणट्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती

जय देव जय देव (जय देव जय देव)
जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा (जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा)
रखुमाईवल्लभा राईच्या वलभा (रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा)
पावें जिवलगा (पावें जिवलगा)
जय देव जय देव (जय देव जय देव)

आषाढी कार्तिकी भक्तजन हो साधूजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती
दर्शनहेळामात्रें तयां होवे मुक्ती
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती

जय देव जय देव (जय देव जय देव)
जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा (जय देव जय देव जय पाण्डुरंगा हो हरी पांडुरंगा)
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा (रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा)
पावें जिवलगा (पावें जिवलगा)
जय देव जय देव (जय देव जय देव)
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP