Sajvuya Sansar

सजवू या हा संसार आपुला या हो तुम्ही पतीदेव या हो
या हो तुम्ही पतीदेव या
हे घर जणू सागर तुम्ही विष्णू मी लक्षुमी पाय चरावया
मी लक्षुमी पाय चरावया

अणा अणा अणा लागला आज पासुनी रोज रोज तुमच्या मागे
अणा लागला आज पासुनी रोज रोज तुमच्या मागे
संसाराची उतरंड रचू
संसाराची उतरंड रचू एकच दोघे होऊया हो
एकच दोघे होऊया

दुसरे आणा हे घ्या तिसरे
दुसरे आणा हे घ्या तिसरे एकावरती एक रचू
प्रेम आपुले माणिकमोती
प्रेम आपुले माणिकमोती यात भरुनी ठेवूया हो
यात भरुनी ठेवूया

कोंड्याचा मी करीन मांडा तुला राजसा काय कमी रे काय कमी
कोंड्याचा मी करीन मांडा तुला राजसा काय कमी रे काय कमी
घर जणू सागर तुम्ही विष्णू मी लक्षुमी पाय चरावया
मी लक्षुमी पाय चरावया
सजवू या हा संसार आपुला या हो तुम्ही पतीदेव या हो
या हो तुम्ही पतीदेव या
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP