Panyat Pahate Ka

पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
प्रतिबिंब हे कुणाचे प्रतिबिंब हे कुणाचे
लावण्य हे निराळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला

भिवई चढे कशाने रागेजशी अशी का
भिवई चढे कशाने रागेजशी अशी का
तू कोण मोहिनी की आहेस चंद्रलेखा
का मानवी दिठीने
का मानवी दिठीने
कांती तुझी विटाळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे

असतीस फूल जरि तू तुज मी खुडून घेते
असतीस फूल जरि तू तुज मी खुडून घेते
वेणीत माळते गे आनंदगीत गाते
आहेस स्‍त्री परंतु आहेस स्‍त्री परंतु
हेवा मनी उफाळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
प्रतिबिंब हे कुणाचे प्रतिबिंब हे कुणाचे
लावण्य हे निराळे
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
Log in or signup to leave a comment

NEXT ARTICLE