पैठणी बिलगुन म्हणते मला
पैठणी बिलगुन म्हणते मला
जानकी वनवास ग संपला संपला
बिलगुन म्हणते मला
पैठणी बिलगुन म्हणते मला
हर्षितो होऊनिया सुंदरी
वल्कले फेकुन दे तू दुरी
हर्षितो होऊनिया सुंदरी
वल्कले फेकुन दे तू दुरी
हर्षितो होऊनिया सुंदरी
वल्कले फेकुन दे तू दुरी
गोजिरा आ आ आ आ
गोजिरा गजरा माळून शिरी
लाव तू भाळी कुंकुम टिळा
लाव तू भाळी कुंकुम टिळा
जानकी वनवास ग संपला संपला
बिलगुन म्हणते मला
पैठणी बिलगुन म्हणते मला
पाहुनी रूप तुझे देखणे
पाहुनी रूप तुझे देखणे
जाहली लज्जित ही भूषणे
पाहुनी रूप तुझे देखणे
जाहली लज्जित ही भूषणे
पतिप्रेमाचे आ आ आ आ
पतिप्रेमाचे उधळित हे सोने
प्रीतिचा दिवाळसण तो आला
प्रीतिचा दिवाळसण तो आला
जानकी वनवास ग संपला संपला
बिलगुन म्हणते मला
पैठणी बिलगुन म्हणते मला
Log in or signup to leave a comment
Login
Signup