गुणि बाळ असा जागसि कां रे वायां
गुणि बाळ असा जागसि कां रे वायां
नीज रे नीज शिवराया
गुणि बाळ असा जागसि कां रे वायां
अपरात्रींचा प्रहर लोटला बाई
तरि डोळा लागत नाहीं
हा चालतसे चाळा एकच असला
तिळ उसंत नाहिं जिवाला
निजवायाचा हरला सर्व उपाय
जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
कां कष्टविशी तुझी सांवळी काया
कां कष्टविशी तुझी सांवळी काया
ही शांत निजे बारा मावळ थेट
शिवनेरी जुन्नरपेठ
त्या निजल्या ना तशाच घांटाखालीं
कोंकणच्या चवदा ताली
ये भिववाया बागुल तो बघ बाळा
किति बाई काळाकाळा
इकडे हे सिद्दी-जमान
तो तिकडे अफजुलखान
पलीकडे मुलुख मैदान
हे आले रे तुजला बाळ धराया
हे आले रे तुजला बाळ धराया
नीज रे नीज शिवराया
गुणि बाळ असा जागसि कां रे वायां
अहो रात्र लाथाबुक्क्याचे अखंड प्रहार सहन
करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ खडखळलं
दही दिशा थरथरल्या काळपुरुषाच्या हि
कानठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा शिवशक्तीचा
नरसिह या स्तंभातून प्रचंड गर्जना
करीत करीत प्रकटला अनंत हाताचे
अग्नितीक्ष्ण नखाग्रांचे  हे नरसिह होते शिवराय
                                
                                                                                Log in or signup to leave a comment
                                    
                                        Login
                                        Signup