Latpat Latpat

लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं ग मोठ्या नखर्याचं
चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग नारी ग नारी ग ह नारी ग ह नारी ग
लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं

कांती नवनवतीची
कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
जशी चवळीची शेंग कवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात
चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग नारी ग नारी ग ह नारी ग ह नारी ग
लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं

रूप सुरतीचा डौल
रूप सुरतीचा डौल तेज अनमोल सगुण गहिना
जशी का पिंजर्यातील मैना
जशी का पिंजर्यातील मैना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
अशी ही चंचल मृगनयना
अशी ही चंचल मृगनयना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
निर्मळ कोमल तेज ग जैसे तुटत्या तार्याचं
चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग नारी ग नारी ग ह नारी ग ह नारी ग
लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं ग मोठ्या नखर्याचं
चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
Log in or signup to leave a comment

NEXT ARTICLE