Jivalaga Rahile Re Door Ghar Maze

जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा जिवलगा जिवलगा
किर्र बोलते घन वनराई सांज सभोती दाटून येई
किर्र बोलते घन वनराई सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे
जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा
गाव मागचा मागे पडला पायतळी पथ तिमिरी बुडला
गाव मागचा मागे पडला पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे
जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा प ध प प ध म प ग म रे गा नी म ध म ध प नि
निराधार मी मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी
निराधार मी मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी
तूच एकला तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे
जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा जिवलगा जिवलगा आ
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP