झाला साखरपुडा ग बाई थाटाचा
रुणुझुणु चुडा हाती गाईल ग
शालू चमचम करील जरीकाठाचा
झाला साखरपुडा
सांग माझ्या कानात नवरा कसा
सांग माझ्या कानात नवरा कसा
शूर मर्द का भितरा ससा
रूप मदन का हृप्प्या जसा
बृहस्पती का येडापीसा
ऐक सांगते तिकडची स्वारी
रूप देखणं नजर करारी
ऐक सांगते तिकडची स्वारी
रूप देखणं नजर करारी
मर्द मावळ्या मुलुखामधुनी
गर्जत जाई गरुडभरारी
मर्द मावळ्या मुलुखामधुनी
गर्जत जाई गरुडभरारी
न ग बाई काय ग
न ग बाई
दिमाग अशी दाऊ ग
स्वर्ग झाला तुला ग दोन बोटांचा
झाला साखरपुडा
नाकाचा सांडगा गालाचा पापड
नाकाचा सांडगा गालाचा पापड
दळुबाई कंडूबाई म्हृणत्यात तसा
केळीच्या पानाला तूप लावुनी
वाढल्या शेवया खाईल कसा
शूर मराठा स्वार फाकडा सांग की
शूर मराठा स्वार फाकडा
ऐट दावितो थाट रांगडा
शूर मराठा स्वार फाकडा
ऐट दावितो थाट रांगडा
ढाल पाठीवर हातात भाला
स्वारी जाते मुलुखगिरीला
ढाल पाठीवर हातात भाला
स्वारी जाते मुलुखगिरीला
हो हो हो हो आ आ आ आ आ हो हो
नग बानू नग बानू
रूपाला अशी भाळून नगं
कसा येईल फुलाला रंग देठाचा
झाला साखरपुडा ग बाई थाटाचा
झाला साखरपुडा
Log in or signup to leave a comment
Login
Signup