Hasnar Kadhi Bolnar Kadhi

ये हसणार कधी
बोलणार कधी
वाट बग
ये हसणार कधी
बोलणार कधी
नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी

हसणार नाही
अरे बापरे
बोलणार नाही
बोंबला
हसणार नाही मी
बोलणार नाही
माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही
हसणार कधी
हसणार नाही
नाकावरचा राग तुझ्या जाणार नाही

मोठ्या मोठ्या बाता बढाया
मारल्या कोणी कोणी कोणी
बघूया ग करू या की
नाही म्हटलंय कोणी कोणी कोणी
मोठ्या मोठ्या बाता बढाया मारल्या कोणी
बघूया ग करू या की
नाही म्हटलंय कोणी
बोलाचाच भात बोलाचीच कढी
बोलाचाच भात नि बोलाचीच कढी
ज्या त्या गोष्टीत पाहू या करू या करूया पाहू या
हसणार कधी
हसणार नाही
नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी

गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण कोण कोण
जाणुन बुजूण भोंदू बगळा बनलंय कोण कोण कोण
आग गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण
जाणुन बुजूण भोंदू बगळा बनलंय कोण
लग्नाची घाई मला बुवा नाही (अच्छा)
लग्नाची घाई मला बुवा नाही
होईल तेव्हा होऊं द्या
केव्हाही कधीही केव्हाही कधीही (हा) (आई आई )
हसणार कधी
बोलणार कधी
नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी
हसणार नाही मी
बोलणार नाही
माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही
ये हसणार कधी
हसणार नाही
नाकावरचा राग तुझ्या जाणार नाही
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP