चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
भरजरी फाडुन शेला भरजरी फाडुन शेला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
बघून तिचा तो भाव अलौकिक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक
कर पाठीवर पडला आपसुख
कर पाठीवर पडला आपसुख
प्रसन्न माधव झाला प्रसन्न माधव झाला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
म्हणे खरी तू माझी भगिनी
भाऊ तुझा मी द्रुपदनंदिनी
साद घालिता येईन धावुनी
साद घालिता येईन धावुनी
प्रसंग जर का पडला प्रसंग जर का पडला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
प्रसंग केसा येईल मजवर
पाठीस असशी तू परमेश्वर
बोले कृष्णा दाटून गहिवर
बोले कृष्णा दाटून गहिवर
पूर लोचना आला पूर लोचना आला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
Log in or signup to leave a comment
Login
Signup